शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री शेट्टरही बंडखोरीच्या पवित्र्यात, सवदींना काँग्रेसची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:30 IST

Karnataka Assembly Election 2023: काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे.

बंगळुरू : काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे आता २२४ पैकी केवळ १५ उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. भाजपमधील असंतुष्टांची संख्या वाढतच असून, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. उद्या, रविवारपर्यंत उमेदवारी न मिळाल्यास पुढील निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुणा या एकाच मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. कोलारमधून काथूर जी. मंजुनाथ यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. काही दिवसांपूर्वीच जनता दल (निधर्मी) मधून पक्षात आलेले के. एक. शिवलिंगे गौडा यांना काँग्रेंसने अरसीकेरेमधून उमेदवारी दिली आहे. जनता दलाने ६ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत १४९ उमेदवार जाहीर केले आहेत. 

कर्नाटकात राष्ट्रवादी लढविणार ४० जागा बंगळूर/मुंबई : कर्नाटकात किमान ४० जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. शरद पवार यांच्या विचारसरणीला अनुसरून भाजपमधील अनेक असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत असे राष्ट्रवादीचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी शनिवारी सांगितले. शरद पवार यांनी पक्षनेते आणि कर्नाटकातील कार्यकर्त्यांशी शनिवारी बैठक घेतली. भाजपच्या चार ते पाच विद्यमान आमदारांसह बंगळुरूचे माजी महापौरही पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असेही रवी यांनी सांगितले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपा