शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 14:41 IST

कर्नाटकात अल्पवयीन मुलाने त्याच्या मावशीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Karnataka Crime :कर्नाटकातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकातल्या एका हत्येच्या खळबळजनक घटनेने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मावशीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थ्याने मावशीकडे लैंगिक संबंधांची मागणी केली होती. मात्र मावशीने त्याला नकार देऊन फटकारल्यामुळे मुलाला संताप अनावर झाला आणि त्याने काकीची गळा दाबून हत्या केली. या हत्येनंतर आरोपी मुलाने मावशीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. मात्र तपासात हत्या झाल्याचे उघड होताच मुलाला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी शहराजवळील एका गावात ही घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या मावशीची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. रविवारी रात्री एक ३७ वर्षीय महिला तिच्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास करून महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली.

३७ वर्षीय महिला तिच्या घरात झोपली होती आणि आरोपी अल्पवयीन मुलगाही तिथे होता. अल्पवयीन मुलाने महिला झोपेत असताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मावशी त्याला विरोध केला आणि फटकारले, तसेच त्याला असे वागू नको असं त्याला सांगितले.  मावशी आपल्या कृत्याबद्दल इतरांना सांगेल या भीतीने काही वेळाने ती पुन्हा झोपली तेव्हा मी उशीने तिचा गळा दाबून खून केला, असे आरोपीने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले.

हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांना मावशीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांना मुलाच्या बोलण्याचा संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी मुलाकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आपणच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. सुरुवातीला पोलिसांना महिलेचा मृतदेह पाहून संशय आला होता. त्यानंतर आपल्या मुलीच्या पाठीवर ओरखडले आल्याची माहितीही त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यामुळे संशयाची सुई मुलाकडे वळली.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपल्या मावशीचा खून करण्यासाठी उशीचा वापर केल्याची कबुली दिली. तोंड दाबत असताना मावशी त्याला दूर ढकलत होते तेव्हा माझ्या पाठीवर ओरखडे आले असावेत असे त्याने सांगितले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस