शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्का, कोण ठरणार किंगमेकर?; लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:01 IST

भाजपचा मुस्लीमविरोध कायम, कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे.

श्रीनिवास नागेविजयपूर : मुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वक्कलिग समाजांना प्रत्येकी दोन टक्के आरक्षण वाढ, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबवण्याची घोषणा यातून भाजपने कर्नाटकात हिंदुत्ववादी मतांना पुन्हा चुचकारले आहे. त्यामुळे लिंगायत आणि वक्कलिग समाजाभोवती फिरणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे.

कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे ५० टक्के खासदार आणि आमदार या दोन जातींचेच राहिले आहेत. पक्ष कोणताही असो, उमेदवारी देताना जातीय समीकरणे मांडून या दोन्ही जातींना प्राधान्य दिले जाते. 

...तर ‘हिंदुत्ववादी शक्तींना’ धक्काकर्नाटक निवडणुकीत जर भाजपचा पराभव झाला तर हा “हिंदुत्ववादी शक्तींना” मोठा धक्का असेल. यामुळे विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी मोठी मदत मिळेल, असे माकपाने म्हटले आहे. भाजपला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा फटका बसत आहे. यामुळेच भाजपने ‘विभाजनाचा अजेंडा’ पुढे ढकलण्यास सुरुवात केली, असे माकपने आपल्या ‘पीपल्स डेमोक्रसी’ या मुखपत्रात म्हटले आहे.

हिंदूविरोधकांचा ‘एन्काउंटर’ करू!भाजपचे ‘फायरब्रँड’ नेते बसनगौडा पाटील- यतनाळ यांनी तर राज्यातील हिंदूविरोधक आणि राष्ट्रविरोधकांना मारले जाईल, अशी थेट धमकी दिली आहे. हिंदू धर्माच्या विरोधकांचा ‘एन्काउंटर’मध्ये खात्मा करू, असे यतनाळ म्हणतात. भाजपचे आमदार बसनगौडा पाटील- यतनाळ १९९४ पासून आमदार- खासदार आहेत. वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते. मुस्लीमबहुल विजयपूरमध्ये त्यांनी मुस्लीमविरोधी ‘अजेंडा’ राबवला आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक