शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"मी मुख्यमंत्री झालो तर अमूल दूध खरेदी करू नका असं कर्नाटकच्या लोकांना सांगेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:24 IST

मी मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन. अमूलला सध्या त्यांच्या ग्राहकांना टिकवायला हवे असं सिद्धारमैया म्हणाले.

बंगळुरू - गुणवत्तेच्या तुलनेने कर्नाटकचे नंदिनी हा गुजरातच्या अमूल इतकाच चांगला ब्रँड आहे. त्यासाठी नंदिनीच्या व्यवसायात अमूलला हस्तक्षेप करू देणार नाही. मी मुख्यमंत्री झालो तर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन याप्रकारे विधान काँग्रेस नेते सिद्धारमैया यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, गुजरातची डेअरी अमूल आणि कर्नाटकची नंदिनी हे कुठल्याही प्रकारे विलिनीकरण होणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटकच्या लोकांना अमूल दूध खरेदी करू नका असं सांगेन. अमूलला सध्या त्यांच्या ग्राहकांना टिकवायला हवे. कर्नाटकात घुसून ते येथीस स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही अमूलला इथं विरोध करणार. मी लोकांना अमूलचं दूध खरेदी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री बनल्यावर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

कर्नाटकात त्रिशंकु नव्हे तर काँग्रेस एकहाती जिंकणार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भविष्यवाणी करत सिद्धारमैया म्हणाले की, आगामी निवडणुकीत काँग्रेसला १३० हून अधिक जागा मिळतील. मागच्यावेळीसारखे त्रिशंकु परिस्थिती उद्भवणार नाही. कारण कर्नाटकात एकाच पक्षाचे सरकार असावे ही जनतेची इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे यावेळी आम्ही जिंकणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुका माझ्यासाठी शेवटच्या असतील. जर मी मुख्यमंत्री बनलो नाही तरी मी पुढील निवडणूक लढणार नाही अशी घोषणाच सिद्धारमैया यांनी केली. 

दरम्यान, १५ व्या वित्त आयोगाने कर्नाटकला ५४९५ कोटी रुपये विशेष अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यामुळे हा रिपोर्ट दुर्लक्ष केला. त्यासाठी कोण जबाबदार आहे? राज्यात दरवर्षी ४ लाख कोटीपेक्षा जास्त महसूल जमा होतो. परंतु राज्याला केवळ ५० हजार कोटी दिले जातात. सध्याच्या सरकारने राज्यासाठी काय केले? असा सवालही सिद्धारमैया यांनी विचारला. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस