शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Kargil Vijay Diwas : 'जरा याद करो कुर्बानी'! नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 09:56 IST

Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले.

नवी दिल्ली - कारगील युद्धांच्या आठवणींना आज 22 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने कारगीलमध्ये बर्फाळ जमिनीवर तिरंगा फडकवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. यापैकीच एक जवान म्हणजे मनजीत सिंग. 

फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. तसेच ते कारगिलमध्ये शहीद झालेले सर्वात कमी ते वयाचे जवान होते. एका शेतकरी कुटुंबात शहीद मनजीत सिंग यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच देशाप्रती प्रेम असल्याने देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेसाठी त्यांचे वडील गुरचरण सिंग यांनी त्यांना 1998 मध्ये सैन्यात भरती केलं. त्यानंतर साधारण दीड वर्षांनी मनजीत यांची ड्यूटी कारगिलसाठी लावण्यात आली. 7 जून 1999 रोजी पाकिस्तानशी दोन हात करताना मनजीत सिंग हे शहीद झाले. 

मनजीत यांच्या नातेवाईकांनी अभिमानाने त्यांना सैन्यात भरती केल्याच सांगत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच अशाप्रकारे ते लवकर सोडून जातील असा विचार ही केला नसल्याचं त्यांनी म्हटलं. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपैकी मनजीत हे सर्वात कमी वयाचे जवान होते. वयाच्या 17 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. तर त्यानंतर अवघ्या दीड वर्षांनी मनजीत युद्धात शहीद झाले. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. लेफ्टिनंट जनरल ए.एन. औल आणि कर्नल अमित औल अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल औल 56 माऊंटन ब्रिगेडचे कमांडर होते. या ब्रिगेडनेच द्रास विभागातील सामरिक दृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या टायगर हिल या शिखरावर कब्जा केला होता.

कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात 'हे' पिता-पुत्र प्राणपणाने लढले; पराक्रमाने शत्रूचे मनसुबे उधळून लावले

लेफ्टिनंट जनरल औल कारगिल युद्धावेळी ब्रिगेडियर होते. तसेच 56 मी माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. या ब्रिगेडने तोलोलिंग आणि टायगर हिलवर विजय मिळवला होता. त्यावेळी अमित औल हे 3/3 गोरखा रायफल्समध्ये  सेकंड लेफ्टनंट या पदावर कार्यरत होते. आमित मारपो ला परिसरात तैनात होते. आता औल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथे राहते. तसेच औल पिता-पुत्रांना त्यांच्या शौर्यासाठी  पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जनरल औल यांना उत्तम युद्ध सेवा मेडल आणि आणि अमित औल यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान