शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:02 IST

20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती.

नवी दिल्ली - 20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. लेफ्टिनंट जनरल ए.एन. औल आणि कर्नल अमित औल अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. गुरुवारी औल पिता-पुत्रांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास परिसरात असलेल्या लामोचन येथे या युद्धाशी संबंधित असलेल्या आपल्या आठवणी जागवल्या. तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहिली.  1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल औल 56 माऊंटन ब्रिगेडचे कमांडर होते. या ब्रिगेडनेच द्रास विभागातील सामरिक दृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या टायगर हिल या शिखरावर कब्जा केला होता. आता लेफ्टनंट जनरल औल  वेस्टर्न कमांडचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदापर्यंत पोहोचून निवृत्त झाले आहेत.  लेफ्टिनंट जनरल औल कारगिल युद्धावेळी ब्रिगेडियर होते. तसेच 56 मी माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. या ब्रिगेडने तोलोलिंग आणि टायगर हिलवर विजय मिळवला होता. त्यावेळी अमित औल हे 3/3 गोरखा रायफल्समध्ये  सेकंड लेफ्टनंट या पदावर कार्यरत होते. आमित मारपो ला परिसरात तैनात होते. आता औल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथे राहते. तसेच औल पिता-पुत्रांना त्यांच्या शौर्यासाठी  पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जनरल औल यांना उत्तम युद्ध सेवा मेडल आणि आणि अमित औल यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  याबाबत अमित औल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी  बातचित करताना सांगितले की, '' युद्ध सुरू असताना मी आईला सर्व गोष्टी सांगू नसेत, असा सल्ला वडिलांनी दिला होता. तू एक सैनिक आहेस आणि युद्धासाठीच बनला आहेस, असे ते म्हणाले होते. दरम्यान, कारगिल युद्ध सुरू असताना मी माझ्या वडिलांशी एकदाही संपर्क केला नव्हता. तसेच युद्ध संपल्यावर सुमारे दोन महिन्यांनंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो,''   

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानIndiaभारत