माकप शहर सचिवपदी कराड
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात शहर कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन शहर सचिवपदी ॲड. वसुधा कराड यांची निवड करण्यात आली.
माकप शहर सचिवपदी कराड
नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात शहर कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन शहर सचिवपदी ॲड. वसुधा कराड यांची निवड करण्यात आली. खुटवडनगर येथील सीटू भवनात झालेल्या या अधिवेशनात सचिव श्रीधर देशपांडे यांनी तीन वर्षांच्या कार्याचा अहवाल मांडला, तर कष्टकरी व तळागाळातील जनतेचे खरे प्रतिनिधित्व माकप करीत असून, क्रांतिकारी विचारांनी भारावलेला हा पक्ष समाजवादी भारताचे स्वप्न पूर्ण करेल, असे प्रतिपादन आमदार जिवा पांडू गावित यांनी केले. जिल्ाचे अधिवेशन २१ व २२ फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील नवापूर येथे होणार असून, या अधिवेशनासाठी ४१ जणांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शहर कार्यकारिणीवर २६ जणांची कमिटी म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनाला जयप्रकाश म्हात्रे, ॲड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, इरफान शेख, सुनील मालुसरे आदि उपस्थित होते.