आपल्या शिक्षणाची फी भरण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचा दावा करून देशभरातून सहानुभूती मिळवणाऱ्या आयुषने रंगविलेली कहाणी आता पूर्णपणे उलटली आहे. कानपूर पोलिसांनी केलेल्या तपास आणि गावातील लोकांच्या जबाबातून समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक आहे. आयुषने ही किडनी हतबलतेतून नाही, तर आपल्या चैनीच्या सवयी आणि प्रेमापोटी विकल्याचे तपासात उघड झाले आहे.
१० एकर जमीन आणि एअर होस्टेस गर्लफ्रेंडआयुषने यापूर्वी दावा केला होता की, फी भरण्यासाठी त्याने आपली जमीन गहाण ठेवली होती. मात्र, वास्तवात त्याने आपल्या वाट्याची सुमारे १५ बिघा म्हणजेच १० एकर जमीन स्वतःहून विकली आणि त्यातून मिळालेले लाखो रुपये उडवले. या काळात त्याचे उत्तर प्रदेशातील एका एअर होस्टेसशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २०१८ मध्ये तो तिला आपल्या गावीही घेऊन गेला होता आणि नंतर देवघर येथे जाऊन तिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न अवघे तीन महिने टिकले.
वडीलांच्या मृत्यूनंतर जबाबदारी झटकली२०१७ मध्ये वडिलांच्या आत्महत्येनंतर आयुषने घरची जबाबदारी घेणे अपेक्षित होते, परंतु तो अधिकच बेजबाबदार झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच त्याने जमिनीची विक्री सुरू केली. फी भरण्याचे केवळ कारण पुढे करून त्याने किडनी रॅकेटच्या माध्यमातून पैसे कमावल्याचे आता स्पष्ट होत आहे.
तपासात पोलखोलआयुषच्या आईने आणि गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शिक्षणापेक्षा मित्र आणि वैयक्तिक आयुष्यातच जास्त गुंतलेला असायचा. 'आय लव्ह मॉम' असे टॅटू गोंदवून स्वतःला मातृभक्त दाखवणाऱ्या आयुषचा खोटेपणा आता उघड झाला आहे. कानपूरचे किडनी रॅकेट आणि आयुषचा यातील सहभाग आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे.
Web Summary : Ayush, who claimed selling a kidney for education, actually sold land for his air hostess girlfriend. He squandered money, neglecting family responsibilities after his father's death. The kidney racket involvement is now under investigation.
Web Summary : शिक्षा के लिए किडनी बेचने का दावा करने वाले आयुष ने एयर होस्टेस गर्लफ्रेंड के लिए जमीन बेची। पिता की मृत्यु के बाद उसने जिम्मेदारी नहीं निभाई और पैसे उड़ा दिए। किडनी रैकेट में उसकी भूमिका की जांच हो रही है।