शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुटुंबाने 17 महिने केली मृतदेहाची सेवा; मृत्यूनंतर खर्च केले तब्बल 30 लाख अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 15:30 IST

जेव्हा संपूर्ण कुटुंब 17 महिने मृतदेह घरात ठेवून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली तेव्हा सर्वच हैराण झाले.

उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमलेश दीक्षित नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी तो जिवंत आहे असं समजून तब्बल 17 महिने त्याचा मृतदेह हा घरामध्येच ठेवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी हा भीषण प्रकार सर्वांच्या समोर आला आणि शेजाऱ्यांसह नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला. जेव्हा संपूर्ण कुटुंब 17 महिने मृतदेह घरात ठेवून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली तेव्हा सर्वच हैराण झाले.

कुटुंबीयांनी विमलेशच्या उपचारासाठी तब्बल 30 लाख रुपये खर्च केले आणि हे सर्व उपचाराच्या नावाखाली करण्यात आलं. एप्रिल 2021 मध्ये विमलेशचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी आणले आणि त्याच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे सांगून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. घरीच उपचार सुरू झाले. 4 दिवसात ऑक्सिजनसाठी कुटुंबाचे 9 लाख रुपये खर्च झाले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने नातेवाईकांनी प्रत्येकी एक लाख रुपये किमतीने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले होते.

कानपूरच्या खासगी रुग्णालयातही सुरू होते उपचार 

विमलेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल 2021 नंतर जेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले, त्यानंतर दीड महिना लखनऊच्या पीजीआयनेही त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण कोरोनामुळे तो हॉस्पिटलमध्ये दाखलही करून घेतलं नाही. त्यानंतर कानपूरमधील कल्याणपूर आणि बारा येथील खासगी रुग्णालयानेही विमलेशचा मृतदेह उपचारासाठी घेतला आणि त्यासाठी मोठी रक्कमही घेतली. 

6 महिने डॉक्टरांनी घरीच केले उपचार 

विमलेशच्या कुटुंबीयांनी असेही सांगितले की, 6 महिन्यांपासून डॉक्टर विमलेशवर घरीच उपचार करत होते. विमलेशला ग्लुकोज दिलं जात होतं. रेमडेसीविर इंजेक्शन विकत घेऊन ते दिलं आणि सहा महिन्यांनंतर नस न मिळाल्याने पुढचे उपचार नाकारले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सध्या पोलीस आयुक्तांनी तीन सदस्यीय तपास पथकाची स्थापना केली आहे. 17 महिने मृतदेह घरात कसा ठेवला याची चौकशी ही टीम करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.