शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली; एस जयशंकर संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:49 IST

जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवलेल्या कनिष्क विमान अपघाताची आठवण करुन दिली.

S Jaishankar on Kanishka Plane Blast :कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता भारताकडून प्रतिक्रिया आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कनिष्क विमान अपघाताचा उल्लेख करुन दहशतवादाच्या मुद्द्यावरून कॅनडाला आरसा दाखवला. आज कनिष्क विमान अपघाताचा (Kanishka Plane Blast) 39वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी आज त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच त्यांनी दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही कॅनडाला दिला.

एस जयशंकर यांनी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, "आज इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादाच्या कृत्यांपैकी एकाची 39 वा स्मृतिदिन आहे. 1985 मध्ये आजच्याच दिवशी मरण पावलेल्या AI 182 'कनिष्क' च्या 329 प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ही जयंती आपल्याला याची आठवण करून देते की, दहशतवाद कधीही खपवून घेतला जाऊ नये."

भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांना श्रद्धांजली वाहिलीकॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. “भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यात आघाडीवर आहे आणि या जागतिक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत आहे,” असे दूतावासाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. 

कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने फोडली डरकाळीदरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. अशातच मंगळवारी(दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. त्यावरुन एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली. 

त्या दिवशी नेमकं काय झालं? 23 जून 1985 रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अटलांटिक महासागरावरुन उडताना कोसळले होते. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी या विमानात बॉम्ब ठेवला होता. या हल्ल्यात 329 लोक मारले गेले, ज्यात 268 कॅनडा, 27 ब्रिटिश आणि 24 भारतीय नागरिकांचा समावेश होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय