शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कन्हैया कुमारने या गोष्टींसाठी केलं नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाला...

By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 19:48 IST

Kanhaiya Kumar praised Narendra Modi News : सीपीआय नेता कन्हैया कुमार हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक आहे. मोदी आणि भाजपाच्या विविध धोरणांवर त्याच्याकडून सातत्याने टीका करण्यात येत असते.

ठळक मुद्देमी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही एक अभ्यासक म्हणून कुठल्याही बाबतीत तटस्थपणे उणिवा पाहतानाच त्यामधील चांगल्या गोष्टींचाही विचार केला पाहिजेनरेंद्र मोदींकडे जो अनुभव आहे. तो प्रत्यक्ष जमिनीवरील आहे. अशा व्यक्तीला हटवणे खूप कठीण

नवी दिल्ली - जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार हा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक आहे. मोदी आणि भाजपाच्या विविध धोरणांवर त्याच्याकडून सातत्याने टीका करण्यात येत असते. मात्र मोदींचा विरोधक असलेल्या कन्हैया कुमारने काही गोष्टींसाठी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.लल्लनटॉपला दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीमध्ये कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचे आपले विचार मांडले आहेत. त्यात तो म्हणाला की, मी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही. मी पीएचडी केली आहे आणि एक अभ्यासक म्हणून कुठल्याही बाबतीत तटस्थपणे उणिवा पाहतानाच त्यामधील चांगल्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे.अन्य महत्त्वाच्या बातम्या -   "अटल टनेल युद्धात निरुपयोगी ठरेल, चिनी सैन्य काही मिनिटांतच नष्ट करेल" चीनची भारताला धमकीया मुलाखतीत कन्हैयाने सांगितले की, नरेंद्र मोदींकडे जो अनुभव आहे. तो जमिनीवरील आहे. अशा व्यक्तीला हटवणे खूप कठीण आहे. मोदींचा राजकीय अनुभव हीच त्यांची शक्ती आहे. गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकत नाही, हे मिथक नरेंद्र मोदींनी तोडले आहे. गरीब कुटुंबातील व्यक्ती आपल्या मेहनतीच्या जोरावर पंतप्रधान बनू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.मोदींनी केवळ सत्ता मिळवली नाही तर ती कायम राखली आहे. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना वेगळे बनवते. मोदींच्या योजनांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. कोण म्हणणार की मुलीला वाचवून शिकवले नाही पाहिजे. कोण म्हणेल की डिजिटल इंडिया झाला नाही पाहिजे. कोण म्हणेल की शौचालय झाले नाही पाहिजे. अजून एक बाब म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांचे खुल्या मनाने मूल्यांकन करतात. त्यांच्यातील चांगल्या बाबी स्वीकारतात, ही बाब त्यांना खास बनवते, असे कन्हैया कुमारने सांगितले.दरम्यान, नरेंद्र मोदींच्या चुकीच्या गोष्टींना मी विरोधही करतो. मोदी म्हणतात की मी स्टेशनवर चहा विकला होता. मग जर तुम्ही चहा विकला असेल तर स्टेशन कुठे विकले. जर तुम्ही बेटी बचाओ म्हणता मह कुलदीप सेंगरसारखे लोक तुमच्याकडे काय करताहेत, असा सवालही कन्हैया कुमारने विचारला आहे.

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारPoliticsराजकारणIndiaभारत