शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 09:27 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे.

नवी दिल्ली/भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. रतुल पुरी यांच्यावर सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी सीबीआयने रतुल पुरी आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने दाखल 354 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता. सदर कंपनी 2009 पासून विविध बँकांकडून कर्ज घेत होती. तसेच कंपनीकडून अनेकदा कर्जाच्या पुनर्गठणाच्या अटींमध्ये बदल केला गेला होता. दरम्यान, बँकेची ही तक्रार आता सीबीआयकडून दाखल गुन्ह्याचा भाग बनली आहे.  सीबीआयने रतुल पुरी यांच्यासोबतच एमबीआयएल कंपनी, त्यांचे वडील दीपक पुरी, आई नीता पुरी तसेच संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर कथितपणे गुन्हेगारी षडयंत्र रचणे, फसवणूक, घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत, असा अधिकाऱ्यांनी सांगितले.  याप्रकरणी बँकेने सांगितले की, रतुल यांनी 2012 मध्ये कंपनीचे कार्यकारी संचालकपद सोडले होते. मात्र त्यांचे आई-वडील संचालक मंडळात होते. दरम्यान, सीबीआयने याप्रकरणी सोमवारी सहा ठिकाणी धाड टाकली होती. दरम्यान, अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी रतुल पुरी यांची चौकशी सुरू आहे. मात्र बँक घोटाळाप्रकरणात आता पुरी यांना ईडीने अटक केली आहे. रतुल पुरी यांच्यावरील कारवाई हा कमलनाथ यांच्या कुटुंबीयांसाठी धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय