शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 11:40 IST

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे.

चेन्नई : प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. मात्र, यानंतर ते बऱ्याचदा वादात सापडले आहेत. सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला 'स्वतंत्र काश्मीर' म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. यामुळे नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे. 

कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल. जनमत घेण्याचा मुद्दा अनेक संघटना उठवत आहेत. जर भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही हासन यांनी म्हटले आहे. 

हासन यांना पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. चेन्नईमध्ये आयोजित एका सभेमध्ये हासन यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये जवान मरण्यासाठी येतात असे कोणी बोलले की आपल्याला वेदना होतात. भारतीय सेनाही जुन्या फॅशनसारखी झालीय. ज्याप्रकारे जग बदलत आहे, आपण कसे ठरवू शकतो की माणूस खाण्यासाठी दुसऱ्या माणसाला मारू शकत नाही. युद्ध, वाद संपवण्याचीही एक वेळ येईल. मानवतेने गेल्या 10 वर्षात काही शिकवले नाही का.

 

पुढे या दाक्षिणात्य अभिनेत्याने म्हटले आहे की, जेव्हा मी मॅगझीन चालवत होतो, तेव्हा काश्मीरच्या मुद्द्यावर खूप काही लिहीले होते. आज मला रडायला येत आहे, कारण जी भविष्यवाणी मी केली होती ती प्रत्यक्ष घडत आहे. मी दुसरी कोणती भविष्यवाणी केली असती तर चांगले होते. काश्मीरमध्ये जनमत संग्रह करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावे...ते असे का करत नाहीत? त्यांनी कोणत्या गोष्टीची भीती आहे. ते देशाची फाळणी करू इच्छित आहेत बाकी काही नाही.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान