शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासन रजनीकांतच्या भेटीला, तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:07 IST

दक्षिणेकडचे दोन मोठे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या तामिळनाडूमधील राजकीय प्रवेशामुळे मोठ्या उलथापालथी होऊ लागल्या आहेत.

चेन्नई- दक्षिणेकडचे दोन मोठे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या तामिळनाडूमधील राजकीय प्रवेशामुळे मोठ्या उलथापालथी होऊ लागल्या आहेत. कमल हासन यांनी रजनीकांतची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोघांनी एकत्र लंचही केला. या भेटीनंतर तामिळनाडू राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही राजकीय भेट नसल्याचं कमल हासन यानं मीडियाला सांगितलं आहे. फक्त एक शिष्टाचार म्हणून मी रजनीकांतची भेट घेतली आहे, असं कमल हासन म्हणाले, तर रजनीकांत यांनी कमल हासन यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कमल हासन लोकांची सेवा करू इच्छितात. ते राजकारणात फक्त प्रसिद्धीच्या झोतात यावं म्हणून आले नाहीत. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, त्यांना राजकारणात यश मिळो, असं रजनीकांत म्हणाले आहेत.तर गेल्या काही दिवसांपूर्वी  थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली होती. रजनीकांत हे भगवे राजकारण करीत असून ते भाजपकडे झुकलेले असल्याने त्यांच्याशी युती करणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले होते. रजनीकांत यांनी भगवे राजकारण करणे कायम ठेवले तर त्यांच्याशी मी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. परंतु मैत्री व राजकारण या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. कमल हसन म्हणाले होते की, आम्हा दोघांच्या राजकीय पक्षांमध्ये काही विचार समान असतील किंवा दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये काही समान मुद्दे असतील तरच युती होण्याची शक्यता निर्माण झाली असती. राज्यातील निवडणुकांच्या आधी मी कोणाशीही युती करणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जर कोणालाच बहुमत मिळाले नाही तर मी विरोधी पक्षात बसणे पसंत करेन असे सांगून कमल हसन म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही पक्षात जायची मला इच्छा नव्हती. त्यामुळे मी स्वत:चा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल व अन्य पक्षांनी दिलेले युतीचे प्रस्ताव मी स्वीकारले नाहीत.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनrajinikanthरजनीकांत