शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कलबुर्गी हत्याप्रकरण गंभीर स्वरूपाचे; सर्वोच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:20 IST

पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचे हत्या प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले आहे. कलबुर्गी हत्येबाबत त्यांची पत्नी उमादेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होईल. ही सुनावणी पुढे ढकलण्याची महाराष्ट्र, कर्नाटक सरकारची विनंती न्यायालयाने अमान्य केली.दोन्ही राज्यांनी या खटल्यामधील आपली बाजू मांडण्याचे काम पूर्ण करावे व पुढील सुनावणीसाठी सज्ज राहावे, असा आदेश न्या. रोहिन्टन नरिमन व न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठाने दिला आहे. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणांमध्ये एक समान धागा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उदय ललित यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेच होते.विवेकाचा आवाज दडपून टाकणाऱ्या प्रवृत्तींविरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याबद्दल काही जणांनी समाधानही व्यक्त केले होते. कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी याआधी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूतील निवासस्थानी पत्रकार गौरी लंकेश व ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्येमध्ये एक समान धागा आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे मुदत मागून घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.कडक शिक्षा करागोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गींची हत्या करणारे एकच असावेत, असा दावा उमादेवी कलबुर्गी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या हल्लेखोरांना कडक शिक्षा सुनावण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय