शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यानं वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 16:40 IST

चेन्नई, दि. 30 -  तामिळनाडूतल्या रामेश्वरम येथे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या कलाम मेमोरियलमध्ये कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 27 जुलै रोजी कलाम यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्तानं कलाम मेमोरियलचं उद्घाटन केलं. त्यानंतर कलाम यांच्या जवळ ठेवलेल्या भगवद्गीतेवरून वाद उफाळून ...

ठळक मुद्दे कलाम मेमोरियलमध्ये कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंकलाम यांच्या जवळ ठेवलेल्या भगवद्गीतेवरून वाद उफाळून आला. मात्र आता भगवद्गीतसोबतच कुराण आणि बायबलही कलाम यांच्या पुतळ्याशेजारी ठेवण्यात आलं

चेन्नई, दि. 30 -  तामिळनाडूतल्या रामेश्वरम येथे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या कलाम मेमोरियलमध्ये कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 27 जुलै रोजी कलाम यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्तानं कलाम मेमोरियलचं उद्घाटन केलं. त्यानंतर कलाम यांच्या जवळ ठेवलेल्या भगवद्गीतेवरून वाद उफाळून आला.कलाम यांच्या पुतळ्याच्या हातात वीणा देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बाजूला भगवद्गीताही ठेवली होती. मात्र आता भगवद्गीतसोबतच कुराण आणि बायबलही कलाम यांच्या पुतळ्याशेजारी ठेवण्यात आलं आहे. डीएमकेसह अनेक राजकीय पक्षांनी वीणा वाजवणा-या कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली होती. तसेच कलाम यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. कलाम यांच्या पुतळ्याजवळ सर्व धर्मांचे महान ग्रथ ठेवायला हवेत, अशी भावना कलाम यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्याची तात्काळ दखल घेत भाजपा सरकारनं कलाम यांच्या पुतळ्याजवळ आता भगवद्गीतेसह बायबल आणि कुराणही ठेवलं आहे.डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात या प्रकारावरून भाजपाला लक्ष्य केलं होतं. कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवून भाजपानं सांप्रदायिकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. कलाम यांच्या पुतळ्याजवळ तमीळमधला महान ग्रंथ तिरुक्करल हासुद्धा नाही, असंही स्टॅलिन म्हणाले होते. वीसीकेचे नेते तिरुमवलन यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीतेला जागा देऊन कलाम हे हिंदू धर्माचे महान पुरस्कर्ते असल्याच्या रूपात त्यांची ओळख करून देण्याची भाजपाची मनीषा तर नाही ना, यामुळे मुस्लिम धर्मीयांचा अपमान झाला आहे. त्यामुळे भगवद्गीता तात्काळ हटवा, अशी मागणीही तिरुमवलन यांनी केली आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारलं आहे. 

गुरुवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले. ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं आणि आदरांजली वाहिली. स्मारकाच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास उलगडला गेला असून त्यांच्या आठवणीही जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्यच एक मोठा आदर्श आहे. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.