शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

काकवी, पेन्सिल शार्पनर होणार स्वस्त; जीएसटी परिषदेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 09:57 IST

राज्यांना थकबाकी लवकरच देणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली.

नवी दिल्ली : पातळ गूळ (काकवी), पेन्सिल शार्पनर्स आणि निवडक ट्रेकिंग उपकरणे यांच्यासह अनेक वस्तूंवरील वस्तू व सेवा करात शनिवारी कपात करण्यात आली. वार्षिक विवरणपत्र उशिरा दाखल केल्यास लागणारे विलंब शुल्कही व्यवहार्य करण्यात आले आहे. वस्तू व सेवाकर परिषदेच्या ४९व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. सीतारामन यांनी सांगितले की, पातळ गुळावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के केला आहे. पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. टॅग-ट्रेकिंग अथवा डेटा लॉगर यांसारखे उपकरण कंटेनरवर आधीच चिकटवलेले असेल, तर त्यावर वेगळा जीएसटी लागणार नाही, अशा कंटेनर्सवर शून्य जीएसटी लागेल.

त्यांनी सांगितले की, जून २०२२ ची जीएसटी भरपाईची १६,९८२ कोटी रुपयांची थकबाकी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही रक्कम केंद्र सरकार आपल्या स्रोतांतून देईल. भविष्यात याची वसुली भरपाई उपकरांतून केली जाईल.या बैठकीस सीतारामन यांच्याव्यतिरिक्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पानमसाला व गुटखा उद्योगांत होत असलेली करचोरी रोखण्यासाठी ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने (जीओएम) सादर केलेल्या अहवालातील शिफारशी बैठकीत स्वीकारण्यात आल्या. 

काय सांगितले अर्थमंत्र्यांनी?अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२२-२३ नंतर २० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींनी मुदतीनंतर जीएसटी विवरणपत्र भरल्यास जे विलंब शुल्क लावले जाते, ते व्यवहार्य (रॅशनलाइज) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वार्षिक ५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यक्तींना आता दररोज ५० रुपये विलंब शुल्क लागेल; पण ते ०.०४ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. ५ कोटी ते २० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्यांसाठी दररोज १०० रुपये विलंब शुल्क लागेल. यालाही ०.०४ टक्क्याची कमाल मर्यादा आहे. सध्या हे शुल्क जीएसटीआर-९ साठी प्रतिदिनी २०० रुपये आहे. 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGSTजीएसटी