शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बॅंकेवर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 13:37 IST

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या जम्मू-काश्मीर बॅंकेवर दहशतवाद्यांनी दरोडा घातल्याची घटना सोमवारी घडली. 

जम्मू-काश्मीर, दि. 31 - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या जम्मू-काश्मीर बॅंकेवर दहशतवाद्यांनी दरोडा घातल्याची घटना सोमवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील अरवानी परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर बॅंकेवर दहशतवाद्यांनी दरोडा घातला. यावेळी बंदुकधारी दहशतवाद्यांनी बुरखा घालून बॅंकेत प्रवेश केला आणि जवळजवळ पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी बॅंक अधिका-यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. तसेच, जिल्ह्यात सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान, याआधी सुद्धा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बॅंक लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी  जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी बँक लुटली होती. यावेळी येथील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेच्या शाखेवर दहशतवाद्यांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात दहशवाद्यांनी 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर, त्याच्या आधीच्या दिवशी  जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला होता. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली होती.