शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिर्रादित्य शिंदे पोहोचले दिल्लीत, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:01 IST

मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देज्योतिर्रादित्य हे मालवा दौऱ्यावर असताना अचानक, मंगळवारी सकाळी त्यांना महाकाल यांचे दर्शन घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले. दिल्लीतून फोन आल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित जंबो मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन किंवा तीन मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.  भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, दुसरीकडे मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांना मंत्रीमंडलात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. 

मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातच, ज्योतिर्रादित्य शिंदे दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरच शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता, गेहलोत यांना राज्यपाल केल्यामुळे ही चर्चा अधिक बळकट झाली आहे. 

ज्योतिर्रादित्य हे मालवा दौऱ्यावर असताना अचानक, मंगळवारी सकाळी त्यांना महाकाल यांचे दर्शन घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले. दिल्लीतून फोन आल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळेच, शिंदे यांचे केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित मानले जात आहे. दरम्यान, गेहलोत राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांची राज्यसभेतील जागाही आता रिक्त झाली असून, भाजपचे राज्यसभेतील नेते म्हणून पीयूष गोयल किंवा प्रकाश जावडेकर यांना संधी निर्माण मिळू शकेल. 

विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ७ जागा रिक्त होत्या. तसेच उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातून राणेही पोहोचले दिल्लीत

महाराष्ट्राच्या वाट्याला 3 ते 4 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डॉ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते. नारायण राणेंनी दिल्लीत पोहतचाच पत्रकारांनी त्यांना घेरले होते. त्यावेळी बोलताना लवकरच आपल्याला सर्वकाही सांगेन, असे राणेंनी म्हटलं. 

या नेत्यांना मिळणार स्थान

मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जोशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह सुशील मोदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घोष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  

मोहन भागवतांनी दिले होते संकेत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळात इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंदिया, रिटा बहुगुणा जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना तसेच युतीतील घटक पक्षांना स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच मोदी सरकारमधून काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर किमान ५-६ मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेdelhiदिल्ली