शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदेनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट, मध्य प्रदेशात तर्कवितर्कांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:19 IST

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री घेतली माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचे वृत्त भेटीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना उधाण

भोपाळ - विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरही मध्य प्रदेशामध्ये राजकीय घडामोडी  सुरूच आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. तसेच या भेटीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेटली.  दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे बंद दरवाजा आड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे बाहेर येत पत्रकारांची भेट घेतली. ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराज सिंह यांची भेट होणार असल्याचे वृत्त आल्यापासून शिवराज सिंह चौहान यांच्या घरासमोर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती.ही एक सर्वसामान्य भेट असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. सोबतच चर्चाही चांगली झाली, असे ते म्हणाले. त्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मध्य प्रदेशमधील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुका याबाबत चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आपण पारंपरिक गुणा-शिवपुरी येथूनच लढणार आहोत, असेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे शिवराज सिंह चौहान यांनीही ही औपचारिक भेट असल्याचे म्हटले आहे. आमच्यात चर्चा झाली मात्र त्यात तक्रार किंवार दुर्भावनेचे सूर नव्हता, असेही चौहान यांनी सांगितले. मात्र या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापले आले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान