शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 04:35 IST

Madhya Pradesh by poll : मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

भोपाळ - मध्यप्रदेश विधानसभेच्या २८ जागांसाठी ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकांत प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया व सचिन पायलट हे दोन युवा नेते समोरासमोर उभे ठाकणार आहेत. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला, तर नाराज सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले होते. त्यामुळे हे दोन नेते निवडणूक प्रचारात एकमेकांवर काय आरोप करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आपले सरकार टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे आणखी ८ आमदार निवडून आणणे आवश्यक आहे. काँग्रेसने जर विधानसभेच्या सर्व २८ जागा जिंकल्या, तर त्या पक्षाचे सरकार पुन्हा मध्यप्रदेशमध्ये स्थापन होऊ शकते. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राजस्थानातील  नेते सचिन पायलट यांच्यावर  मोठी कामगिरी पक्षाने सोपविली  आहे.काँग्रेसमध्ये असताना ज्योतिरादित्य सिंदिया व सचिन पायलट यांची घनिष्ठ मैत्री होती. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते; पण सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेSachin Pilotसचिन पायलट