शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:14 IST

पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

भोपाळ - पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, उमेदवारांच्या निवडीसाठी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच पक्षाचे मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात खडाजंगी उडाली.बुधवारी रात्री मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय निवड बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र ही बैठक दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील खडाजंगीमुळेच गाजली. आपापल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळवून देण्यावरून दिग्विजय आणि शिंदे यांच्यात वाद झाला. सुरुवातीला चर्चेच्या माध्यमातून सुरू झालेल्या वादाने पुढे खडाजंगीचे रूप घेतले. हा प्रकार सुरू असताना तिथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते.  शेवटी हा वाद निस्तरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. अशोक गहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांचा समावेश असलेल्या या समितीने रात्री उशिरा बैठक घेऊन वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या वादावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. सध्यातरी या वादावर कोणतेही भाष्य करण्यास पक्षाकडून सर्व नेत्यांना मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे.  नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर असेल. काँग्रेस आणि भाजपाकडून 5 नोव्हेंबरपर्यंत आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही पक्षांची पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rahul Gandhiराहुल गांधीDigvijaya Singhदिग्विजय सिंह