शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

शिक्षेच्या भीतीपायी न्यायमूर्ती कर्णन परागंदा ?

By admin | Updated: May 11, 2017 16:33 IST

सुप्रीम कोर्टाच्या अवमानाप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्ती सी. एस. कर्णन हे देशातून परागंदा झाल्याची माहिती न्या. कर्णन यांच्या कायदेशीर सल्लागारांनी दिली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - सुप्रीम कोर्टाच्या अवमानाप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्ती सी. एस. कर्णन हे देशाबाहेर गेल्याची माहिती न्या. कर्णन यांच्या कायदेशीर सल्लागारांनी दिली आहे. कोलकाता पोलिसांच्या पथकाकडून न्या. कर्णन यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांनी देश सोडल्याचं सांगितलं आहे. न्या. सी. एस. कर्णन यांनी अटक टाळण्यासाठी देश सोडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कर्णन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार होती. त्याआधीच ते देशाबाहेर गेल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचे पोलीस त्यांचा मागावर असून, त्यांचा शोध घेत आहेत. काल सकाळी ते चेन्नईकडे रवाना झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. चेन्नई पोलिसांच्या मते, कर्णन यांनी बुधवारी सकाळीच सरकारी अतिथीगृह सोडले असून, आंध्र प्रदेशकडे ते रवाना झाले आहेत, असे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून समजते. दरम्यान, न्या. कर्णन हे अटक टाळण्यासाठीच देश सोडून गेले असावेत, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. न्या. कर्णन नेपाळ किंवा बांगलादेशात जातील, अशी शक्यता त्यांचे निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. मात्र, मार्ग आणि इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.सर्वोच्च न्यायालयानं न्या. कर्णन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता चेन्नई येथे जाण्यासाठी त्यांनी कोलकाता येथील आपले निवासस्थान सोडले होते. दुपारी ते चेन्नईला पोहोचल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले. सध्या न्या. कर्णन हे कोठे आहेत, याची माहिती नसल्याचे समजते. (न्या. कर्णन यांना सहा महिन्यांचा कारावास)न्या. कर्णन यांनी सहकारी न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आणि निराधार करून तसेच सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांनाही धाब्यावर बसून एकूणच न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेस बट्टा लावला. त्यामुळे त्यांना न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) दोषी ठरवून सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष घटनापीठाने न्या. कर्णन यांना शिक्षा ठोठावली.कोलकत्याच्या पोलीस आयुक्तांनी न्या. कर्णन यांना तात्काळ अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असाही आदेश दिला गेला. त्यानुसार सायंकाळी पोलीस न्या. कर्णन यांच्या तेथील शासकीय निवासस्थानी गेलेही. पण सरन्यायाधीशांना शिक्षा ठोठावणारा आदेश सोमवारी दिल्यानंतर न्या. कर्णन चेन्नईला गेले होते आणि तेथे ते 11 मेपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता कर्णन गायब झाले आहेत. न्यायालयाने ही अवमानना कारवाई सुरू करून नोटीस काढल्यानंतरही न्या. कर्णन हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढले गेले होते. त्यानंतर ते फक्त एका तारखेला आले आणि नंतर त्यांनी कोलकात्यात बसून सर्वोच्च न्यायालय व त्यांच्या न्यायाधीशांविरुद्ध निरनिराळे आदेश देणे सुरू केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतेही न्यायिक अथवा प्रशासकीय काम करण्यास मनाई करूनही त्यांनी हा संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला.