शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

न्या. शरद बोबडे आज होणार सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:19 IST

महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळेल सर्वोच्च मान

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे सोमवारी भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारतील. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळणार आहे.सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात होणाºया साध्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद न्या. बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे २३ एप्रिल २०२१ रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींची उपस्थिती या सोहळ््यात लक्षणीय ठरणार आहे. न्या. बोबडे मुळचे नागपूरचे असल्याने व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी अनेक वर्षे प्रॅक्टीस केल्याने नागपुरातील बहुतांश मंडळी शपथविधी सोहळ््याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सांबरे, महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांच्यासह आदी मंडळी दिल्लीत दाखल झाली आहेत. अनेकांना न्या. बोबडे यांनी खासगी निमंत्रण पाठविले आहे.सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश बोबडे आणि न्या. भूषण गवई यांच्यासमक्ष न्यायालयीन सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा देखील एक ऐतिहासिक क्षण नागपूरकरांसाठी असणार आहे. वकील, अतिरिक्त न्यायाधीश, न्यायाधीश आणि सरन्यायाधीश या एकूण प्रवासात त्यांच्यासोबत राहीलेले अनेक मित्र, सहकारी, ज्युनियर्स, पत्रकार या निमित्ताने दिल्लीत दाखल झाले आहेत.दिल्लीतील मराठी वकिलांमध्ये आनंद : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या मराठी माणसांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. जवळपास सर्वांसाठीच मराठी सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात काम करण्याची ही पहिली वेळ असणार आहे. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालये मिळून २०० अधिक मराठी वकील मंडळी दिल्लीत कार्यरत आहेत.न्यायाधीशांना सूचनामुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायाधीशांना शपथविधीसाठी सुट्या घेऊन दिल्लीत येऊ नका, अशा सूचना सरन्यायाधीशांनी दिल्या आहेत. न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने न्या. बोबडे यांनी या सूचना दिल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय