शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 10:43 IST

जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'जिरो बॅलेन्स-जिरो चार्ज'चं अकाऊंट सुरू करण्यासाठी खूप प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीरो बॅलेन्सचं जन-धन खातं सुरू करावं, यासाठी आपल्या भाषणातूनही लोकांना सांगितलं. पण आता जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, बेसिक सेव्हिग्स बँक अकाऊंट ज्यामध्ये पंतप्रधान जन-धन योजनेचाही सहभाग आहे ते अकाऊंट्स फ्रीज होणं व नंतर सुरळीत होण्याचा धोका आहे. 

खरंतर या अकाऊंटला महिन्यातून चार व्यवहार केले जाऊ शकतात. ज्यावर कुठलीही बँक कुठलाही चार्ज आकारू शकत नाही. चार व्यवहारांनंतर बँक चार्ज लावू शकते. पण आता चार व्यवहारा पूर्ण झाल्यावर बँकेकडून ही खाती फ्रीज केली जात आहेत. तर दुसरीकडे, एचडीएफसी, सिटी बँक अशा बँका चार व्यवहारांनंतर ही खाती सामान्य खात्यामध्ये बदलते आहे. जन-धन खातं रेग्युलर झालं तर त्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवला नाही तर अकाऊंट धारकांना पेनल्टी भरायला लागते. 

इतकंच नाही, तर बँकांनी फ्री ट्रॅन्झॅक्शनच्या व्याख्येलाही पूर्ण बदललं आहे. यामध्ये फक्त एटीएममधून काढलेले पैसे नाही तर, आरटीजीएस, एनइएफटी, ब्रॅन्च विड्रॉवल, इएमआयचाही सहभाग केला जातो आहे. खातं सुरू केल्यावर जर ग्राहकाने सुरूवातीला चार व्यवहार केले तर नंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीला पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागते आहे. 

दरम्यान, ही संपूर्ण माहिती आयआयची मुंबईच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक ऑफ इंडिया त्यांच्याकडील खातं फ्रीज करते आहे. तर एचडीएफसी आणि सिटी बँक ही खाती रेग्युलर खात्यात बदलते आहे. आयसीआयसीआय बँकेने पाचव्या व्यवहारावर चार्ज घ्यायला सुरूवात केली होती पण विरोधानंतर हा चार्ज बंद करण्यात आला. 

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी