शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Waqf Amendment Bill : "JPC एक फसवणूक, मुस्लीम व्यक्ती CEO नसणार, कलम १०४ रद्द, अन्..."; वक्फ दुरुस्ती विधेयकावरून AIMPLB चा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:46 IST

Waqf Amendment Bill : मोहम्मद फजलुर्रहीम म्हणाले, या विधेयकात दुरुस्ती झाल्यानंतर, वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन मुस्लीमांकडे राहणार नाही. ते सरकारच्या नियंत्रणात जाईल...

 Waqf Amendment Bill : आज प्रचंड गदारोळात वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झाले. हे विधेयक लोकसभेत सादर होण्यापूर्वी, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) पत्रकार परिषद घेऊन या विधेयकाला विरोध केला आहे. यासंदर्भात बोलताना, हे विधेयक मुस्लीम समाजाचे अधिकार कमकुवत करणारे असून ते सरकारने तातडीने मागे घ्यावे, असे असे सरचिटणीस मोहम्मद फजलुर्रहीम यांनी म्हटले आहे.

मोहम्मद फजलुर्रहीम म्हणाले, या विधेयकात दुरुस्ती झाल्यानंतर, वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन मुस्लीमांकडे राहणार नाही. ते सरकारच्या नियंत्रणात जाईल. या विधेयकात करण्यात आलेले बदल अत्यंत गंभीर आहेत. यामुळे वक्फ व्यवस्था पूर्णपणे बदलून जाईल.

विधेयकासंदर्भातील मुख्य आक्षेप? -वक्फ बोर्डाच्या CEO पदावर आता मुस्लीम व्यक्ती नसेल. वक्फ संपत्तींचे नियंत्रण आता सरकारकडे असेल. वक्फ प्रकरणांमध्ये सहभागी असलेला वकिल (व्यावसायिक) मुसीलिम असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कलम ३C(2) अंतर्गत जोवर अधिकारी निर्णय घेत नाही, तोवर वक्फ संपत्ती सरकारी संपत्ती माणनली जाईल. जे लोक 12 वर्षांपासून एखाद्या वक्फ संपत्तीवर असतील, केवळ त्यांनाच तेथे राहता येईल. कलम १०४ रद्द करण्यात आले आहे.

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने संयुक्त संसदीय समितीवरही (JPC) गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद फजलुर्रहीम म्हणाले, "JPC ने हे प्रकरण आणखीनच बिघडवले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याचा समावेश केल्याने, तो नेहमी सरकारच्या बाजूनेच निर्मय घेईल. JPC म्हणजे पूर्णपणे एक फसवणूक आहे."

सरकारकडे विधेयक मागे घेण्याची मागणी - हे विधेयक म्हणजे मुस्लीम समाजाच्या अधिकारांवर हल्ला आहे. सरकारने यावर पुनर्विचार करावा, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. तसेच, हे विधेयक म्हणजे, वक्फ संपत्तींवरील सरकारचे नियंत्रण वाढविण्याचा कट आहे. यामुळे मुस्लीम समाजाचे मोठे नुकसान होईल, असेही AIMPLB ने म्हटले आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMuslimमुस्लीमlok sabhaलोकसभा