शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Joshimath Landslide : जोशीमठ भूस्खलन; सैन्याच्या 25-28 इमारतींनाही तडे, जवानांना सुरक्षित ठिकाणी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:41 IST

Joshimath Landslide : गेल्या काही दिवसांपासून जोशीमठमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असून, शेकडो लोकांनी घरं खाली केली आहेत.

Joshimath Landslide : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये होत असलेल्या भूस्खलनाचा परिणाम भारतीय लष्कराच्या इमारतींवरही दिसून येत आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, लष्कराच्या सुमारे 25-28 इमारतींना तडे गेले आहेत. यामुळे जवानांना जोशीमठ येथून तात्पुरतं इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे. गरज भासल्यास लष्कराच्या जवानांना औली किंवा इतर ठिकाणीही पाठवलं जाईल, असेही ते म्हणाले.

जोशीमठमध्ये सैन्य मदतीसाठी पुढे आलं

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 15 जानेवारीला लष्कर दिनापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, जोशीमठ ते माण या रस्त्याला तडे गेले आहेत. BRO याबाबत काम करत आहे, पण याचा परिचालन तयारीवर परिणाम झालेला नाही. LAC पासून जोशीमठ फक्त 100 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत हे क्षेत्र सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अशा परिस्थितीत जोशीमठमध्ये लष्कर आणि आयटीबीपीचे जवान तैनात असतात. एवढंच नाही तर स्थानिक लोकांच्या मदतीसाठी लष्करही पुढे आल्याचं मनोज पांडे यांनी सांगितलंय. लष्करानं नागरी प्रशासनाला रुग्णालये, हेलिपॅडही दिले आहेत.

जोशीमठमधील 723 घरांना तडेजोशीमठमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 723 घरांना तडे गेले आहेत. एवढंच नाही, तर अनेक ठिकाणी रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत. जमिनीतूनही पाणी वाहत आहे. ज्या घरांना तडे आहेत, त्या घरांवर लाल रंगाचे निशाण लावण्यात आलं आहे. लोकांना घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत सुमारे 150 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. लोकांना दीड लाख रुपयांची अंतरिम मदतही जाहीर झाली आहे. त्यांना त्यांच्या मालमत्तेची बाजारभावानुसार भरपाईही दिली जाईल, असं सरकारचं म्हणणं आहे.

खराब हवामानामुळे चिंता वाढलीजोशीमठमधील हवामान सतत खराब होत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच चिंता वाढली आहे. बुधवारी झालेल्या पावसानंतर आणखी घरांना तडे गेल्याचंही सांगण्यात येत आहे. तर ज्या घरांना अगोदरच भेगा होत्या, त्या आणखी वाढल्या आहेत.

सीएम धामी यांनी जोशीमठला भेट दिलीउत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जोशीमठच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी बुधवारी रात्री सीएम धामी यांनी बाधित घरांना आणि मदत शिबिरांना भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशीही संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलनIndian Armyभारतीय जवान