शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग तरुणाला 50 लाखांच्या नोकरीची ऑफर! कोडिंग स्पीड पाहून मायक्रोसॉफ्टचे एक्स्पर्टही चकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 10:03 IST

Job Offer: शारीरिक कमतरतांना जे लोक यशातील अडथळा समजतात, त्यांच्यासाठी इंदूरच्या यशची ही यशोगाथा खूप काही सांगून जाते. यश सोनकिया या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीने ५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. 

इंदूर : शारीरिक कमतरतांना जे लोक यशातील अडथळा समजतात, त्यांच्यासाठी इंदूरच्या यशची ही यशोगाथा खूप काही सांगून जाते. यश सोनकिया या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीने ५० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. 

यश आठ वर्षांचा असताना त्याला कमी दिसू लागले आणि कुटुंबीय काळजीत पडले. ग्लुकोमामुळे पीडित असलेल्या यशवर कमी वयातच अनेक ऑपरेशन झाले; पण आठ ऑपरेशननंतरही त्याला डोळ्यांनी दिसत नव्हते. आठ वर्षांचा असतानाच त्याच्या डोळ्यासमोर केवळ अंधार होता. यशला सामान्य शाळेऐवजी दृष्टिहीन मुलांच्या शाळेत प्रवेश दिला गेला. त्याने लहानपणीच ठरविले होते की, इंजिनिअर व्हायचे आहे. आपल्या या स्वप्नामागे धावताना त्याने शारीरिक कमतरतेला अडथळा होऊ दिले नाही. अलीकडेच दिलेल्या या मुलाखतीत यशने इतक्या वेगाने कोडिंग केली की, हे पाहून मायक्रोसॉफ्टचे तज्ज्ञही अवाक झाले.

स्क्रीन रीडरच्या  मदतीने काेडिंगयश हा स्क्रीन रीडर साॅफ्टवेअरच्या मदतीने काेडिंग करताे. शिक्षणादरम्यान त्याने यावर प्रभुत्व मिळविले हाेते. यशच्या वडिलांचे इंदूरमध्ये काेर्टाजवळ चहा-नाश्त्याचे एक लहानसे दुकान आहे. मुलाच्या या यशाने आई-वडील अतिशय आनंदी आहेत.

यशची यशोगाथा यश एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील इंदूरच्या कोर्टाजवळ चहा, नाश्त्याचे दुकान चालवितात. यशने इंदूरच्या एसजीएसआयटीएसमधून २०२१ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मायक्रोसॉफ्ट ही त्याची नोकरीची पहिलीच कंपनी आहे. त्याला काेणत्या कंपनीत नाेकरी करायची आहे, याची एक यादीच त्याने केली हाेती.

टॅग्स :jobनोकरी