शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:21 IST

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. 

एस. पी. सिन्हा -

पाटणा : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची ६ कोटी २ लाखांची मालमत्ता जप्त करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. 

आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव, मिसा भारती, हेमा यादव आणि इतर आरोपींची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी ईडीने बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील मालमत्ता जप्त केल्या. पाटणा येथील बिहटा, महुआबाग, दानापूर येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्लीतील ‘डी’ ब्लॉकमधील संपत्ती आणि गाझियाबादमधील मालमत्ता जप्त केली.

काय आहे प्रकरण?-  २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेमंत्री असताना त्यांनी बेकायदेशीरीत्या एका खासगी कंपनीला भुवनेश्वर आणि रांची येथे हॉटेल चालवण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात या कंपनीने त्यांना पाटना येथे ३ एकर जमीन दिली होती. -  याप्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय