शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

JNU Violence: हिंसाचारामागे 'तो' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप; 7 जणांची ओळख पटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 13:43 IST

ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य; लवकरच चौकशी होणार

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराची योजना आखण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या माध्यमातूनच हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. दिल्ली पोलिसांना या ग्रुपमधील ७ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. याआधी या प्रकरणात पोलिसांना ३७ जणांची ओळख पटली आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य आहेत. यापैकी ४४ जणांची ओळख पटली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. जेएनयूवरील हिंसाचाराबद्दल 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीनं एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. हिंसाचारामागे एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची माहिती स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली. हिंसाचाराची संपूर्ण आखणी याच ग्रुपमध्ये करण्यात आली. युनिटी अगेन्स्ट लेफ्ट असं या ग्रुपचं नाव आहे. या ग्रुपमधील ४४ जणांची ओळख पटवण्यात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला यश आलं आहे. या सगळ्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेनं दिली आहे. जेएनयूमध्ये हिंसाचार कसा झाला, त्यासाठीची योजना कशी आखण्यात आली, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, याची माहिती स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे. अक्षत अवस्थी नावाच्या विद्यार्थ्यानं जेएनयू हिंसाचाराबद्दलची संपूर्ण माहिती स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली. आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असल्याची कबुलीदेखील अक्षतनं व्हिडीओमध्ये दिली. यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अक्षतला चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधी हिंसाचार प्रकरणातील ९ जणांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यांना चौकशीसाठी नोटिसदेखील पाठवण्यात आली आहे. या ९ आरोपींमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषचा समावेश आहे. महिला पोलीस अधिकारी तिची चौकशी करतील. या प्रकरणात आतापर्यंत १३ सुरक्षा कर्मचारी आणि ५ विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे. 

टॅग्स :jnu attackजेएनयू