शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू संघटनेचे हायकोर्टात हॉस्टेल नियमावली दुरुस्तीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 04:04 IST

वसतिगृह नियमावलीत दुरुस्ती करण्याच्या आंतरनिवास प्रशासनाच्या (आयएचए) निर्णयास जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली - वसतिगृह नियमावलीत दुरुस्ती करण्याच्या आंतरनिवास प्रशासनाच्या (आयएचए) निर्णयास जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वसतिगृह शुल्क वाढविण्याची यात तरतूद आहे.जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशी घोष आणि पदाधिकारी साकेत मून, सतीश चंद्र यादव व मोहम्मद दानीश यांनी आयएचएचने २८ आॅक्टोबर २०१९ रोजी जारी केलेल्या इतिवृत्तासह, २४ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अधिकारक्षेत्राला आणि समितीच्या शिफारशींना आव्हान दिले आहे. आयएचएने घेतलेला निर्णय मनमानी, बेकायदेशीर आणि दुर्भावपूर्ण असून, त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम करणारा आहे. वसतिगृह नियमावलीत दुरुस्ती करण्याचा निर्णय जेएनयू अधिनियम १९६६, विधि, वटहुकूम आणि वसतिगृह नियमावलीतील तरतुदीविरुद्ध आहे.आयएचएमधील विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व कमी करणे, वसतिगृह निवास शुल्क वाढविण्याच्या दुरुस्तीचा यात समावेश आहे. वसतिगृह नियमावलीतील पोटनियमातील दुरुस्त्या विद्यापीठातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम करणाऱ्या आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.कुलगुरू हटावची मागणी अनुचित -पोखरियालवसतिगृह शुल्कवाढसंदर्भातील मूळ मागणी मान्य करण्यात आल्याने कुलगुरू एम. जगदेश कुमार यांना हटविण्याची मागणी करणे आता अनुचित नाही. कोणाला हटविणे, हा तोडगा नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे.जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक सत्रासाठी नोंदणी केली आहे. अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना कोणीही त्रास देऊ नये. जागतिक स्पर्धेत विद्यापीठ उत्कृष्ट करायचे असेल, तर अशा मुद्द्यांवर मात करायला हवी.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र