शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सुरक्षा दलांना मोठं यश, जैशच्या कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:30 IST

Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter : सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे.

ठळक मुद्देकाल सुरक्षा दलाने स्थानिक काश्मिरी दहशतवादी जहांगीरला ठार केले होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे. काल सुरक्षा दलाने स्थानिक काश्मिरी दहशतवादी जहांगीरला ठार केले होते. जम्मू काश्मीर पोलीसचे आयजी विजय कुमार यांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी सुरक्षा दलाचे अभिनंदन केले. (J&K: Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter)

जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. 

सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सज्जाद याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, तो स्थानिक नागरिक असून बर्‍याच वर्षांपासून कार्यरत होता. 2008 मध्ये प्रथमच त्याचे नाव उघडकीस आले होते. यानंतर 2015 मध्ये सक्रिय दहशतवादाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, असे प्रामुख्याने समोर आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी