शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vaishno Devi Incident: “श्रद्धाळू ऐकतच नाहीत, विशेषत: तरुण पिढी”; वैष्णोदेवी घटनेवर जितेंद्र सिंह यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 10:16 IST

Vaishno Devi Incident: जखमींना उपचारांसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जम्मू: जम्मू काश्मीरमधील कटरा येथे असलेले श्री माता वैष्णो देवी मंदिर (Vaishnodevi Temple) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३  हून अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. या ठिकाणी येणारे भाविक समजून घेत नाही. विशेष करून तरुण पिढी ऐकून घेत नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रद्धाळू ऐकतच नाहीत, विशेषत: तरुण पिढी

जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असून गेलेले नाही. कोरोनासंदर्भात गाइडलाइन्स देण्यात आलेल्या आहेत. तरीही वैष्णो देवी मंदिरात मोठी गर्दी झाली. विशेष करून तरुण पिढी समजून घेत नाही. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी उपस्थित होती. त्यावेळेस बाचाबाची झाल्याचे सांगितले जात आहे. दर्शनासाठी येणारे भाविक समजून घेत नाहीत. दुसरीकडे तरुण पिढी ऐकत नाही. कोरोनाच्या गाइडलाइन्स पुन्हा लागू करण्यात आल्या असून, एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना उपचारांसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर