शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

झारखंडच्या निवडणुकीत भाजपला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:04 IST

८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे.

रांची : ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून, ३० नोव्हेंबरपासून मतदानास सुरुवात होईल. त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे.लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर ५० जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपची कोंडी केली.भाजपने आपल्या सहकारी पक्षांमधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात विरोधकांनी कोणताही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या राज्यात भाजपला बेरोजगारी, शेती व आर्थिक मंदी यासारख्या मुद्यावर जनमताला बरोबर घेणे तारेवरची कसरत करण्यासारखे ठरणार आहे.राज्यात सरकारविरोधी जनमत नाहीच. विरोधकांची अनेक शकले पडली आहे, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. महाराष्टÑात भाजप व शिवसेना यांची ३० वर्षांची युती तुटल्याचा काही परिणाम झारखंडमध्ये होईल का, असे विचारले असता एका नेत्याने सांगितले की, महाराष्टÑासारखी स्थिती येथे येऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. बंडखोरांनी भाजपची मते कमी करू नयेत, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. लोजपा व जदयू येथे स्वबळावर लढले तरी पक्षाला चिंता नाही, कारण केंद्रात हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये आहेत.मागील निवडणुकीत भाजपने ३७ जागा, तर एजेएसयूने ५ जागा जिंकल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा पक्ष स्वबळावर लढत आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019