शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 08:03 IST

सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरेच, काॅंगेसची उपमुख्यमंत्रिपदाची  मागणी सोरेन यांनी अमान्य केली आहे.

एस. पी. सिन्हारांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची झामुमोप्रणीत आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर सोरेन यांनी झारखंडचे राज्यपाल संतोषकुमार गंगवार यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला होणार आहे. ते पत्नी कल्पना सोरेन यांना मंत्रमंडळात सहभागी करुन घेऊ शकतात. शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, राजदचे नेेते तेजस्वी यादव आदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काॅंगेसची उपमुख्यमंत्रिपदाची  मागणी सोरेन यांनी अमान्य केली आहे.

अशी आहे हेमंत सोरेन यांची राजकीय कारकीर्दहेमंत सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र आहेत. २००९ साली राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, २०१० मध्ये या पदाचा राजीनामा देऊन ते तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनले. २०१३ साली हेमंत सोरेन त्या राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०१९ साली काँग्रेस, राजदच्या पाठिंब्यावर ते पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते.

कल्पना सोरेन यांनी झामुमोला सावरलेईडीने सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यावेळी रांची येथील ईडी कार्यालयात कल्पना सोरेन या आपल्या पतीला जेवण व औषधे देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रसारमाध्यमांनी आवर्जून दखल घेतली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबरला कल्पना रांची विमानतळाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येत असताना हेमंत सोरेन यांनी त्यांचे छायाचित्र टिपले होते. आमच्या स्टार कॅम्पेनरचे स्वागत असो. या मजकुरासहित त्यांनी सदर छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. कल्पना सोरेन या इंजिनियर असून त्यांनी एमबीएही केले आहे. सोरेन तुरुंगात असताना पक्षाला कल्पना यांनीच सावरले.

टॅग्स :jharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस