शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा; चंपई सोरेन नवे CM

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 21:15 IST

जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

रांची - ED Arrest Hemant Soren ( Marathi News )  कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले. जवळपास ४० तासानंतर अचानक सोरेन दिल्लीहून रांचीत परतले. आज झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. ईडीच्या चौकशीत अडकलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन यांना झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहू शकतात असं बोललं जात आहे.  सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा १२५० किमीचा प्रवास केला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची सोरेन यांनी बैठक घेतली. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले. 

कोण आहे चंपई सोरेन?

चंपई सोरेन यांचा झारखंडमधील कोल्हान भागात बराच प्रभाव आहे, म्हणूनच त्यांना 'टायगर' म्हणून ओळखले जाते. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर किंवा अटकेनंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या सीएम होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, मात्र आता चंपई यांना मुख्यमंत्री बनवले जात आहे. चंपई सोरेन यांची झारखंडच्या राजकारणात मोठी भूमिका मानली जाते. यामुळेच हेमंत सोरेन यांच्या पत्नीसह मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या इतर चेहऱ्यांपेक्षा त्यांचा पगडा भारी आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय