शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान;  २३ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 01:09 IST

झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे

नवी दिल्ली : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३0 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. या नक्षलग्रस्त राज्यामध्ये मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला होईल. त्यानंतरच्या चार टप्प्यांत ७, १२, १६ व २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या नक्षलग्रस्त राज्यात २०१४ साली झालेली विधानसभा निवडणूकही पाच टप्प्यांत पार (पान ९ वर) पडली होती.आदिवासीबहुल झारखंडमध्ये सध्या भाजप सत्तास्थानी आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांना सत्तेवरून घालविण्यासाठी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह अन्य विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात २०, तिसºया टप्प्यात १७, चौथ्या टप्प्यात १५, पाचव्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच, राज्यामध्ये आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. महाराष्ट्र, हरयाणामधील विधानसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत १४ पैकी १0 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

भाजप सत्ता राखणार?झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. मात्र मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कारकीर्दीत झारखंडचा अजिबात विकास झाला नाही अशी टीका विरोधकांकडून होत असते. रघुबर दास हे झारखंडमध्ये पाच वर्षे पूर्ण करू शकणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी तिथे अस्थिर सरकारे अस्तित्वात होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग