शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 799 रुपयात करा विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 19:02 IST

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी वर्षभर या विमान कंपन्या वेगवेगळया ऑफर्स देत असतात.

ठळक मुद्दे विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे देशातंर्गत हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे.

मुंबई, दि. 7 - विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे देशातंर्गत हवाई प्रवास आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात आला आहे. जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी वर्षभर या विमान कंपन्या वेगवेगळया ऑफर्स देत असतात. आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा विमान कंपनीने स्वस्त हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे. 

विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर आहे. आज मध्यरात्रीपासून 9 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या ऑफरमध्ये 23 ऑगस्ट 2017  ते 19 एप्रिल 2018 या कालावधीसाठी तिकीट बुकिंग करता येईल. 

या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी आहे. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल. 

ऑफरतंर्गत श्रीनगर-जम्मू रुटवर सर्वात स्वस्त 799 रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. त्याशिवाय दिल्ली-अमृतसर, दिल्ली-चंदीगड मार्गावर तुम्ही अनुक्रमे 1,199 आणि 1,299 रुपयात तुम्ही प्रवास करु शकता. दिल्ली-श्रीनगर आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावर 1,499 रुपयात तिकीट बुक करु शकता. 

मागच्या महिन्यात एअर इंडियाची होती ऑफरमागच्या महिन्यात एअर इंडियाने सर्वात स्वस्त 706 रुपयात हवाई प्रवासाची ऑफर दिली होती.  एअर इंडियाने मान्सून ऑफरमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट अवघ्या 706 रुपयांपासून उपलब्ध होते. एअर इंडियाची ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीसाठी होती. त्यासाठी 17 जून ते 21 जून दरम्यान तिकीट बुक करावं लागणार होतं. एअर इंडियाचं बुकिंग ऑफिस, अधिकृत ट्रॅव्हल्स एजंट वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बूक केलेल्यांना या ऑफरचा लाभ घेता आला. ठरावीक शहरांमधील प्रवासासाठीच ही ऑफर होती.