शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:00 PM

अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

अनंतनाग - जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात मंगळवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत भारतीय लष्कराला मोठं यश प्राप्त झालं आहे. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैश कमांडर सज्जाद भटला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलं आहे. 

अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भट लष्कराच्या निशाण्यावर होता. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र सज्जादने रचलं होतं. भारतीय लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्या अनेक तळांना लक्ष्य केलं आहे. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

कोण आहे सज्जाद भट?पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भटबाबत एनआयएने खुलासा केला होता. पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसापूर्वी सज्जाद भटने इको कार खरेदी केली होती. दक्षिण काश्मीर खोऱ्यात सज्जाद भट राहत होता. देवबंदी मदरसा सिराज-उल-उलम येथून सज्जादने शिक्षण घेतलं. भटची आई त्राल येथे राहण्यास आहे. याचठिकाणी दहशतवादी बुरहान वाणी वास्तव्यास होता. सज्जाद भटची ओळख आत्मघाती हल्लेखोर म्हणून आहे. त्याला 2018 मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच भटच्या वडिलांना 2017 मध्ये पकडण्यात आलं होतं. 

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवरुन सुरक्षा यंत्रणेची कारवाई दक्षिण काश्मीरच्या जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली. त्यानंतर भारतीय जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारास लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.  

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं होतं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर