शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जेईईचा ‘टॉपर’ चिराग घेणार नाही आयआयटीला प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 05:48 IST

केवळ कौशल्य तपासण्यासाठी दिली परीक्षा; अमेरिकेतील एमआयटीत घेणार शिक्षण

पुणे : आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत पुण्याच्या चिराग फलोर या विद्यार्थ्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र तो भारतात कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणार नाही. त्याला अमेरिकेतील 'एमआयटी केंब्रीज’ येथे प्रवेश मिळाला असून चार वर्षे तो अमेरिकेतच शिक्षण पूर्ण करणार आहे.चिराग फलोर याने सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत ३९६ पैकी ३५२ गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्याने जेईई मेन्स परीक्षेत ३०० पैकी २९६ गुण मिळवले होते.अमेरिकेत एमआयटीच्या प्रवेश परीक्षेत त्याने चांगले यश मिळविले होते. इंटरनॅशनल आॅलिम्पियाड स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘बाल शक्ती’ पुरस्काराने गौरविले. मोदी यांनी ट्विटमध्ये चिरागचा ‘माझा मित्र’ असा उल्लेख केला होता. चिराग मूळचा राजस्थानचा असून त्याने अकरावी- बारावीचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. त्याचे वडील खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलचा वापर बंदगेल्या चार वर्षांपासून मी अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करत होतो. मागील वर्षी मी अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल वापरणे बंद केले होते. स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्यासाठी मी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दिली होती. देशात पहिला येण्याची इच्छा आणि अपेक्षा होती. मला अ‍ॅस्ट्रोफिजिक्स क्षेत्रात संशोधन करायचे आहे. - चिराग फलोर१५ वर्षांतला नीचांकी निकाल : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गेल्या पंधरा वर्षातील यंदा सर्वात कमी निकाल लागला आहे. २०१६ मध्ये २० टक्क्यांपर्यंत निकाल खाली आला होता. मात्र यंदा खुल्या संवर्गाचा निकाल १७.५ टक्के तर एससी, एसटी संवर्गाचा निकाल पावणे नऊ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे यावर्षी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा अवघड होती. हे स्पष्ट होते. - दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक