शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षविरोधी कारवाया करणा-या 21 जणांना जेडीयूने केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:47 IST

संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केल्यापासून जेडीयूमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केल्यापासून जेडीयूमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सोमवारी जदयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन 21 सदस्यांना निलंबित केले. नितीश कुमारांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय जदयूच्या अनेक नेत्यांना पटलेला नाही.

ही आघाडी झाल्यापासून सातत्याने पक्षविरोधी सूर लावणारे जदयूचे प्रमुख नेते शरद यादव यांना अखेर शनिवारी राज्यसभेच्या नेतपदावरुन हटवण्यात आले. राज्यसभेतील जदयूचे भाजपा खासदार अली अन्वर यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही.   

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी टि्वटकरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. वास्तविक जदयूने या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती. 

आता कोणालाच घाबरत नाही - शरद यादवजेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे. 

जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, 'काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.

त्यामुळे पक्षात फूट अटळ आहे. पक्षाचे केरळमधील राज्यसभा सदस्य वीरेंद्र कुमार यांनी यापूर्वीच नितीश यांचा निर्णय आपणास मान्य नसून, आपण केरळमध्ये प्रादेशिक पक्ष स्थापन करून तेथील काँग्रेस प्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये सहभागी होणार आहोत, असे जाहीर केले आहे.