शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्टी; नितीश कुमारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:10 IST

प्रशांत किशोर आणि पवन वर्मा दोघांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध, तसेच कार्यपद्धतीविरुद्ध वर्तन करुन पक्षाची शिस्त मोडली.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्टÑीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) समर्थन केल्याने बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरुद्ध उघड टीका केल्याने जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि सरचिटणीस पवन वर्मा यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.प्रशांत किशोर आणि पवन वर्मा दोघांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध, तसेच कार्यपद्धतीविरुद्ध वर्तन करुन पक्षाची शिस्त मोडली. त्याच्या एकूणच पक्षविरोधी वर्तन पाहता दोघांनाही पक्षाची शिस्त पाळायची नाही, असे जेडीयूचे मुख्य सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रशांत किशोर हे मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोपही जेडीयूने केला आहे.मंगळवारी नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्या टीकेची निंदा करताना म्हटले होते की, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून किशोर यांना पक्षात सामील केले होते. यावरून प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार खोटे बोलत असल्याचा आरोप केला.पक्षाची प्रतिष्ठा खालावू नये म्हणून किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करणे जरूरी आहे, असे जेडीयूने म्हटले आहे.किशोर यांंचा नितीश कुमारांवर निशाणाजेडीयूतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहोत, यासाठी किशोर यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नितीशजी! आपण बिहारच्या मुख्यमंत्रीपदीराहोत, यासाठी शुभेच्छा. ईश्वर आपले भले करो, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोर