शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
जागतिक मंदीमुळे झालेले व्यावसायिक नुकसान पाहता कर्ज फेडताना गल्लत केली जाऊ नये. सहेतूक कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईलच, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. काही लोक खरोखरच बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतले असून मुद्दाम कर्ज बुडवले जाते. अशा लोकांसाठी कठोर कायदा अवलंबला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जावी यासाठी तपास संस्था कामाला लागल्या आहेत, असे ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.
त्यांनी २ मार्च रोजी देशातून पसार झालेल्या मल्ल्या यांचा मात्र थेट उल्लेख केला नाही. बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी सवार्ेच्च न्यायालयाकडून सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच ते लंडनला गेल्याचे मानले जाते.(वृत्तसंस्था)
-----------------------
मंदीमुळेही उद्योग डबघाईस.....
जागतिक मंदी किंवा यापूर्वीच्या सरकारच्या धोरणात्मक अपयशामुळे जागतिक मंदीचा तडाखा झेलू न शकणाऱ्या कंपन्याही कर्जबाजारी बनल्या आहेत. कर्ज बुडविणाऱ्या अशा कंपन्यांचा वेगळा संच आहे. अनुत्पादक कर्जाबाबत (एनपीए) धोरणात्मक हस्तक्षेप करीत योग्य तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. चुकीच्या आर्थिक डावपेचांमुळे किंवा बाह्य घटकांमुळे व्यवसाय मोडकळीस येत असेल तर त्यात बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे काहीही नाही. व्यावसायिक समस्या उद्भवणाऱ्या कंपन्यांना अशा प्रकारच्या समस्या येऊ नये, असे सरकारला वाटते. त्यामुळे सरकार ओळख पटविण्याचे काम करेल. भविष्यात उद्योगावर नादारीची वेळ येऊ नये यासाठी संरचनात्मक मुद्यांकडे सरकार लक्ष घालेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
--------------------------------
मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र वारंट...
जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीचा ५० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याबद्दल समन्स बजावूनही मल्ल्या यांनी न्यायालयात हजेरी न लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हैदराबादच्या न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावला आहे. मल्ल्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष असलेल्या मल्ल्या यांच्याविरुद्ध १४ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १० मार्च रोजी अजामीनपात्र वारंट जारी केला. त्यांनी या प्रकरणी १३ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.
------------------------
मल्ल्यांचे पुन्हा टिष्ट्वट ...
कर्ज बुडविल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये मीडिया माझ्यामागे हात धुवून लागल्याचा आरोप पुन्हा अज्ञात स्थळाहून टिष्ट्वट पाठवत केला आहे. त्यांनी नेमके ठिकाण बघितलेले नाही, ही दु:खाची बाब आहे. मी मीडियाशी बोलून माझा वेळ आणि प्रयत्न वाया घालविणार नाही, असेही ते म्हणाले. काही टिष्ट्वटस्सोबत मल्ल्या यांनी टिष्ट्वटरवर संदेशांचा सपाटाच लावला आहे. त्यांनी विमान वाहतूक, क्रीडा आणि मद्य कंपन्यांमधील समस्याही मांडल्या आहेत. टिष्ट्वटचा मला कंटाळा आला असून लोकांना ते कळत नाही, असे त्यांचे पुत्र सिद्धार्थ मल्ल्या यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले.