शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 05:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी 'विज्ञान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी 'विज्ञान रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांना दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने सन्मानित केले जाते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात देशभरातील २५ वैज्ञानिकांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन सन्मानित केले. यात विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम अशा श्रेणींचा समावेश आहे.

१४ शास्त्रज्ञांना विज्ञान युवा पुरस्कारराष्ट्रपतींनी पद्मविभूषण जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित केले. विज्ञान युवा श्रेणीत आठ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री आणि १४ शास्त्रज्ञांना विज्ञान युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर विज्ञानातील संघ पुरस्कार अरोमा मिशन सीएसआयआरला देण्यात आला.मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे डॉ. युसुफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), मुंबईतील इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे अनिरुद्ध भालचंद पंडित यांना (अभियांत्रिकी विज्ञान), नागपूरच्या नीरीचे डॉ. एस. वेंकट मोहन यांना (पर्यावरण विज्ञान), मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे महान महाराज आणि सब्यसाची मुखर्जी यांना (गणित आणि संगणकीय विज्ञान), पुण्याच्या आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राचे सुहृद श्रीकांत मोरे यांना (भौतिक विज्ञान) आणि बंगळुरूच्या राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्राच्या डॉ. दीपा आगाशे यांना (जैविक विज्ञान) क्षेत्रात केलेल्या असाधारण कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Narlikar Posthumously Awarded Vigyan Ratna; Other Scientists Honored

Web Summary : Jayant Narlikar received the Vigyan Ratna posthumously. President Murmu honored 25 scientists for excellence in science, engineering, and technology, including those from Mumbai, Nagpur, and Pune, across various scientific disciplines at a ceremony in New Delhi.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष