शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या अंगलट; उत्तर प्रदेशात सलूनची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 16:35 IST

जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

ठळक मुद्देजाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे. री उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या जावेद हबीबच्या सलूनवर संतप्त जमावाने हल्ला केला.जावेद हबीबच्या सलूनवर हल्ला करणारे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लखनऊ, दि. 9- काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबच्या सलून्सच्या देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरण्यात आले होते. जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचं अपमानजनक चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबाद येथील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ अंतर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान शनिवारी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या जावेद हबीबच्या सलूनवर संतप्त जमावाने हल्ला केला. इतकंच नाही, तर सलूनमधील सामानाची तोडफोड केली. 

जावेद हबीबच्या सलूनवर हल्ला करणारे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यांनी आधी मोतीनगरमधील सलूनवरही हल्ला केला होता, असंही पोलिसांनी सांगितलं. हिंदू जागरण मंचाकडून झालेल्या हल्ल्याच्या वेळी सलूनमध्ये काही ग्राहक अडकले होते. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या सलून मालकाला त्यांचा व्यवसाय बंद करा अन्यथा त्याचे परिणाम भोगण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सलूनमध्ये त्यावेळी असलेल्या काही प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेतली जाते आहे. 

हिंदू देवतांचा अपमान करणारी गोष्ट घडली तर त्याकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष केलं जाणार नाही. आम्ही जावेद हबीबचं हे सलून चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया हिंदू जागरण मंचाचे प्रादेशिक सचिव विमल द्विवेदी यांनी दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांने सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रांमध्ये आक्षेपार्ह जाहिराती दिल्या. जाहिरातीमध्ये हिंदू देवी-देवता हबीब यांच्या सलूनमध्ये आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातींवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. यावरून काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली होती. भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा देत जावेद हबीब याचा निषेधही नोंदवला होता. त्यानंतर काही वेळातच हबीब याने ट्विटरवरून माफी मागितली होती. हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याविरुद्ध हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीच्या सलून्सची चेन आहे. त्यांच्या जाहिरातीसाठी काही दिवसांपूर्वी देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. पण, जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचं अपमानास्पद चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबादमधील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ या कलमातंर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच जावेद हबीब यांना नोटीस पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी हबीबकडून अगोदरच लेखी माफीपत्र सादर करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितले.