शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जशोदाबेन म्हणाल्या, मी मोदींची पत्नी; ते माझे राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 09:23 IST

 मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य...

अहमदाबाद -  मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य मोदींच्या विभक्त राहणाऱ्या पत्नी जशोदाबेन यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी  नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याच्या केलेल्या दाव्यावर जोरदार टीका करताना जशोदाबेन यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचा दावा मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केला होता. आनंदीबेन पटेल यांच्या या वक्तव्याबाबत जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आनंदीबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असल्याचा दावा केल्याने मला धक्का बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना मोदींनी स्वत: विवाहित असल्याचे शपथपत्र देत पत्नीच्या रकान्यात माझ्या नावाचा उल्लेख केला होता."आनंदीबेन यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याची टीका करताना जशोदाबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहत नसले तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे जशोदाबेन यांनी सांगितले. आनंदीबेनसारख्या एका सुशिक्षित महिलेने एका शिक्षिकेबाबत असे बोलणे अशोभनीय आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी सन्माननीय आहेत. ते माझ्यासाठी रामासारखे आहेत." असे जशोदाबेन म्हणाल्या. दरम्यान, आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना जशोदाबेन यांचे भाऊ अशोक मोदी यांनी हे वक्तव्य जशोदाबेन यांचेच असल्याचे सांगितले. आनंदीबेन पटेल यांचे वक्तव्य जेव्हा सोशल मीडियावर प्रसारित झाले तेव्हा आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या वक्तव्याचे वृत्त जेव्हा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले तेव्हा आम्ही याचा उत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जशोदाबेन यांची प्रतिक्रिया मोबाइलवर रेकॉर्ड करून आम्ही प्रसारित केली, असे अशोक मोदी यांनी सांगितले.  .'  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJashodabenजसोदाबेनnewsबातम्या