शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिंजो आबेंसह मोदींचा 8 किमीचा रोड शो, जपानच्या पंतप्रधानांनी परिधान केलं मोदी जॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:35 IST

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहे. या दरम्यान ते आज अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत 8 किमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रोड शो केला आहे. अहमदाबाद विमानतळावरही जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंची खास व्यवस्था करण्यात आली होती. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर राहिले आहेत.

अहमदाबाद, दि. 13 - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आले आहे. या दरम्यान ते आज अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत 8 किमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रोड शो केला आहे. या दरम्यान  शिंजो आबे यांनी मोदी जॅकेट घातल्यानं अनेकांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं. अहमदाबाद विमानतळावरही जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंची खास व्यवस्था करण्यात आली होती. शिंजो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर राहिले होते. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंजो आबेंसह सिदी सैय्यद मशिदीलाही भेट दिली आहे. बुलेट ट्रेनचा उद्या भूमिपूजन सोहळा होणार असून, यानिमित्तानं शिंजो आबे भारताच्या दौ-यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणुकीचे 15 करार होणार आहेत.अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंतच्या या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शोमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले गेले आहेत. आबेंनी साबरमती गांधी आश्रमालाही भेट दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्यासोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी आश्रमातला चरखा शिंजो आबे व त्यांच्या पत्नीला दाखवला आहे. सिदी सय्यद मशिदीतील दगडांच्या नक्षीकामाचीही शिंजो आबेंनी भरभरून स्तुती केली.  1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. आठ किलोमीटरच्या रोड शोच्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश असून, एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28 राज्यांतील कलाकार आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्यकला सादर करतील. विशिष्ट प्रकारच्या दगडी बांधकामामुळे ही मशिद लक्ष वेधून घेते. यावेळी दोन्ही नेत्यांसमोर शहरातील पुरातन वास्तूंचे प्रेझेंटेशन केले आहे. उद्या गुरुवारी दोन्ही नेते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी करतील. अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.कशी असणार बुलेट ट्रेन ?10 डब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे. पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200 जणांना प्रवास करता येईल. बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 88 हजार कोटी रुपये जपान कर्ज म्हणून देणार आहे. 2022 पर्यत हा प्रकल्प पूर्ण करायचा उद्देश आहे. त्याचवर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.