शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनला जपानी कंपन्यांचे पोलाद?, ‘मेक इन इंडिया’ धोरणाला बसणार तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:11 IST

भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला पोलाद पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जपानच्या प्रमुख पोलाद आणि अभियांत्रिकी कंपन्या सरसावल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले.

नवी दिल्ली/टोक्यो : भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला पोलाद पुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जपानच्या प्रमुख पोलाद आणि अभियांत्रिकी कंपन्या सरसावल्या असल्याचे सूत्रांनी म्हटले. १७ अब्ज अमेरिकन डॉलरची ही कंत्राटे जपानने मिळवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आर्थिक धोरणाला मोठा तडा बसणार आहे.बुलेट ट्रेन प्रकल्पाला जपानकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असून, रेल्वे मार्गांसाठी जे महत्त्वाचे घटक लागणार आहेत त्यातील ७० टक्के जपानच्या कंपन्यांकडून पुरवले जाणार आहेत, असे या विषयाशी संबंधित असलेल्या पाच सूत्रांनी सांगितले. यावर भाष्य करायला पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने नकार दिला. या प्रकल्पात गुंतलेल्या जपानच्या वाहतूक मंत्रालयातील अधिकाºयाने सांगितले की, प्रकल्पाच्या महत्त्वाच्या घटकांच्या पुरवठ्याच्या धोरणावर दोन्ही देश अजूनही काम करीत आहेत व येत्या जुलैच्या जवळपास योजना तयार असेल. या अधिकाºयाने स्वत:चे नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.पुढील वर्षी मोदी यांना लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे असून, देशात लक्षावधी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दडपण त्यांच्यावर आहे. मोदी यांच्या टीकाकारांचे म्हणणे असे आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्प हा पैशांचा अपव्यय असून तो पैसा अधिक चांगल्यारीतीने वापरता आला असता. जपानच्या कंपन्यांनी भारतीय कंपन्यांची कार्यक्षमता आणि ठराविक वेळेत काम पूर्ण करण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. (वृत्तसंस्था)सप्टेंबर २०१७ मध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पावर दोन मुद्यांवर सहमती झाली. एक म्हणजे मेक इन इंडियाला प्रोत्साहन आणि दुसरे म्हणजे जपानने तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. यामुळे भारताला देशात उत्पादनाच्या सोयी उभारता येतील व जपानच्या तंत्रज्ञानाच्या आधारे रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन