शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा जानेवारी १२१ वर्षांतील सर्वाधिक उष्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:25 IST

देशात सरासरी किमान तापमान १४.७८ अंश सेल्सिअस, तापमानवाढीचा परिणाम?

नवी दिल्ली : हवामान बदलाचे जगभरातील तापमानावर विपरीत परिणाम हाेत आहेत. विविध खंड आणि प्रदेशातील सरासरी तापमान वाढले आहे. यंदाच्या हिवाळ्यात देशातील काही भागांत सरासरी तापमानात वाढ नाेंदविण्यात आली आहे. देशाच्या सरासरीचा विचार केल्यास जानेवारीत गेल्या ६२ वर्षांतील सर्वाधिक सरासरी तापमानाची नाेंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी जानेवारी महिना १०० वर्षांतील उष्ण महिना ठरला आहे. जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असते. मात्र, तापमान वाढत असून थंडीचे दिवस कमी हाेत आहेत. वाढत्या तापमानामुळे ग्लेशियर्स वितळत आहेत. दाेन दिवसांपूर्वीच उत्तराखंड येथे हिमकडा काेसळून आलेल्या महापुरात अनेकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारच्या घटना हा धाेक्याचा इशारा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दक्षिण भारतातील किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारीत १४.७८ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान नाेंदविण्यात आले आहे. यंदाचा जानेवारी महिना दक्षिण भारतात गेल्या १२१ वर्षांतील सर्वांत उष्ण ठरला आहे. यावेळी २२.३३ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान  नाेंदविण्यात आले आहे. यापूर्वी १९१९ मध्ये २२.१४ तर २०२० मध्ये २१.९३ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान हाेते. मध्य भारतात १४.८२ अंश सेल्सिअस सरासरी तापमान हाेते. गेल्या १२१ वर्षांत १९५८ मध्ये १५.०६ अंश सेल्सिअस तापमान हाेते. देशाच्या एकूण सरासरीचा विचार केल्यास १९०१ पासून केवळ १९५८ मध्ये १४.७८ अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान नाेंदविण्यात आले हाेते. त्यानंतर यावर्षी एवढे तापमान हाेते. यापूर्वी १९१९ मध्ये सरासरी १५ अंश सेल्सिअस तापमान हाेते. आतापर्यंतचे ते सर्वाधिक किमान सरासरी तापमान ठरले आहे. जानेवारीतील सरासरी तापमान दक्षिण भारत          २२.३३ अंश सेल्सिअस मध्य भारत            १४.८२ अंश सेल्सिअस १२१ वर्षांतील तुलनावर्ष    २०२१    १९१९ तापमान    १४.७८    १५.०

टॅग्स :Temperatureतापमान