शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: काश्मीर घाटीत पुन्हा हिंसाचार; काल काश्मीरी पंडिताची हत्या, आज पोलिसावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:55 IST

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पोलिस काँस्टेबल रियाज अहमदवर गोळीबार करण्यात आला.

Jammu-Kashmir:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी घटना वाढल्याये पाहायला मिळत आहेत. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज दहशतवाद्यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात ते गंभीर जखमी झाले. रियाझच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सध्या रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.

काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर निदर्शनेगुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर निदर्शने सुरू झाली. छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच केंद्र सरकारवर अपयशाचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निदर्शने करण्यात आली.

दहशतवाद्यांचे टार्गेट किलिंग मोठी दहशतवादी घटना करता येत नसल्यामुळे आता दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केली आहे. रियाझ अहमदवर झालेला हल्लाही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. यापूर्वी खोऱ्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हत्या केल्या होत्या, त्यावरुन दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांना लक्ष्य करण्यात आले. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला